भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे २० भाषात १५०० गायकांनी केले गीतगायन

कोल्हापूर : ऐतिहासिक दसरा चौक मैदानात गायक संगीतकार कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून अश्वघोष आर्ट अन्ड कल्चरल फौडेंशनच्या वतीने देशातील २० भाषामध्ये १५०० गायकांनी हम भारत के लोग अर्थात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे गीत गात विश्वविक्रम नोंदविला. केंद्रीय संस्कृती मंत्रालय, सामाजिक न्याय व विशष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (पूणे) महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान कार्यक्रमातंर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास सामाजिक न्याय राज्य मंत्री नाम. रामदासजी आठवले, पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर, नियोजन मंडळाचे अध्यक्ष आम. राजेश क्षिरसागर, समाजकल्याणचे प्रधान सचिव हर्षदिप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, समाजकल्याणचे सहा. आयुक्त भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे गीत सादर करतानी गायक कलाकार सचिन साळे कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सतीश माळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठी, हिंदी, इंग्रजी, कोकणी, पाली, संस्कृत, कन्नड, उर्दू, पंजाबी, गुजराती, राजस्थानी, बंगाली, सिंधी, भोजपुरी, असामी, नेपाळी, तेलुगु, ओडिसी, मैथिली तसेच भारतीय सांकेतिक भाषा ( मूकबधिर) अशा भारतातील एकूण २० भाषांमध्ये सुमधुर संगीतासह संविधानाचे प्रास्ताविक गीत प्रत्येकी ७५ गायकांकडून गायले गेले. देशभरातून लहानांपासून वृद्धांपर्यंत गायक कलाकार यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संविधानाला मानवंदना देणारा अशा प्रकारचा हा जगातील पहिलाच कार्यक्रम ठरला. यामध्ये विद्यापीठ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील शिक्षक व विद्यार्थी असे ८१ गायक गुजराती भाषेमधून संविधान प्रास्ताविकेचे गायन गायन केले आहे