आपला जिल्हा
तुरंबेच्या मयुरी भावके यांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुरस्कार

कोल्हापूर: ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी गावाचे कारभारी म्हणून अहोरात्र झटणाऱ्या सरपंचांचा सन्मान करण्यासाठी दैनिक पुढारीच्या वतीने ‘सरपंच सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी सरपंच मयुरी सागर भावके (तुरंबे ता. राधानगरी) यांचा राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सरपंच सन्मान मिळाला. या सन्मान सोहळ्या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस., अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. माजी सरपंच मयुरी भावके यांचा सन्मान झाल्यानंतर पंचक्रोशीतून शुभेच्छांच्या माध्यमातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.